आमच्या विषयी

शिवदौलत सहकारी बँक ................ .
"शिव-दौलत" या पावित्र नावातील पावित्र्य जपत संस्थापक आदरणीय आमदार श्री. शंभूराज देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली,रिझर्व्ह बँक व सहकार खाते यांनी घालून दिलेल्या चाकोरीत काम करत, ठेवीदारांचा विश्वास संपादन करून त्यांच्या दौलतीत भर घालत,कर्जदारांना दौलत कमवण्यासाठी अर्थसाह्य करून छोट्या लोकांची मोठी बँक……….! याकडे वाटचाल करणारी आपली सर्वांची शिवदौलत सहकारी बँक……………...

शिवदौलत सहकारी बँकेचा मागील १८ वर्षांचा मागोवा -------------
०१ जून २००१ रोजी एका छोट्या जागेत सुरु झालेल्या बँकेच्या रोपट्याचे बारा वर्षच्या अल्प कालावाधीतच वृक्षात रुपांतर होत आहे. आजमितीस बँकेचे ५३६२ हून अधिक भागधारक असून सुमारे २५००० वर ग्राहक आहेत आणि बँकेचा एकूण बिझनेस रु. १५० कोटींच्या वर आहे..२००१ साली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत,आदरणीय आमदार श्री शंभूराज देसाई साहेब यांनी स्व. लोकनेते दौलतराव उर्फ बाळासाहेब देसाई व स्व. शिवाजीराव देसाई(आबासाहेब) यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन व त्यानच्या नावातील आध्यआक्षर "शिव–दौलत" घेवून पाटण तालुक्यातील मध्यमवर्गीय लोकांसाठी बँक स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. आदरणीय आमदार शंभूराज देसाई साहेबांचा निश्चय आणि सर्वचे अथक प्रयात्नांचे फळ म्हणजेच दि. ०१ जुन २००१ रोजी झालेली बँकेची स्थापना. सुमारे ६०० चौ. फुटाच्या छोट्याच्या जागेत ६ कर्मचाऱ्यांच्या साथीने बँक सुरु झाली. यानंतर खालील मान्यवरांनी बँकेच्या चेअरमन पदाची धुरा सांभाळली.

आदरणीय आमदार श्री शंभूराज शि. देसाई सन २०००-२००१ ते २००१-२००२
श्री. जयशिंग य. संकपाळ ( भाऊ ) सन २००२-२००३ ते २००६-२००७
अँड. मिलिंद ता. पाटील सन २००६-२००७ पासून

आदरणीय आमदार श्री शंभूराज देसाई साहेब यांचा मार्गदर्शनाखाली सर्व संचालकांचा दुर्दम्य ध्येयवाद व उत्साह यामुळे बँकेने लवकरच सातारा जिल्यात गरुड झेप घेतली व आर्थिक प्रगतीसाठी नवी क्षेत्रे शोधण्यास सुरुवात केली. बँकेने पाटण तालुकयात मल्हारपेठ,ढेबेवाडी, तारळे,दौलतनगर व पाटण अशा ५ शाखा व पाटण तालुकया बाहेर मलकापूर ( कराड ) व गोडोली (सातारा) अशा एकूण ७ शाखा उघडल्या आहे.

बँकेच्या सुरुवाती पासूनच दरवर्षी बँकेच्या व्यवसायात व नफ्यात वाढ होत आहे. Capital Adequacy, Profitability, Net NPA, CRR आणि SLR याबाबतचे निकष बँक दरवर्षी पूर्ण करत आहे आणि त्यामुळेच दरवर्षी रिझर्व बँकेकडून बँकेला चांगला दर्जा मिळत आहे. दिनांक ३१/०३/२०१९ रोजी संपलेले आर्थिक वर्षाची त्यास अपवाद नाही. स्थापनेपासून गेली १८ वर्षे बँकेला ऑडिटमध्ये सतत अ वर्ग मिळत आहे. दि. ३१/०३/२०१९ रोजी बँकेचे Net NPA 0.00%, CRAR १२.३५% असून बँकेच्या मजबूत स्थितीचे हे द्योतक आहे.

मुदत ठेवींवर बँक आकर्षक व्याजदर तर देतेच पण हे दर इतर व्यापारी बँकांच्या व्याजदरापेक्षा थोडे जास्त असतात. याशिवाय, रिजिस्टर्ड सहकारी संस्था आणि ज्येष्ठ नागरिक यांना ०.५% p.a. अधिक व्याजदर दिला जातो,तसेच वैयक्तिक कर्ज, गृहकर्ज, वाहन कर्ज, पर्यटन कर्ज, शैक्षणिक कर्ज, व्यवसायासाठी कर्ज अशा कितीतरी कर्ज योजना बँकेने ग्राहकांसाठी चालू केल्या आहेत. प्रत्येकाच्या गरजेनुसार त्याप्रकारचे कर्ज बँक योग्य व्याजदराने व ठराविक मुदतीकरिता उपलब्ध करून देते. व्यवसायवृद्धीसाठी तसेच जनतेचे राहणीमान उंचावण्यासाठी बँकेने आजरोजी ५००० च्या वर खातेदारांना कर्जवाटप केले आहे.दरवर्षी सभासद कल्याण निधी मधून १०वी, १२वी व स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या सभासदांच्या पाल्यांचा गुणगौरव करण्यात येतो.

यावरून एक गोष्ट लक्षात येते, कि बँकेची झालेली प्रगती हि आदरणीय आमदार श्री. शंभूराज देसाई साहेब यांचे मार्गदर्शन व पाटण तालुक्यातील जनतेचे प्रेम व विश्वास याचे सामुहिक यश आहे. संचालकांचे कल्पक नेतृत्व आणि कर्मचाऱ्यांची मेहनत, चिकाटी, हुशारी आणि प्रामाणीकपणा तसेच तत्पर व आपुलकी वाटावी अशी ग्राहकसेवा यांतच बँकेच्या यशाचे गमक आहे.


मुख्य कार्यालय >